नांदेड विभागाकडून संत निरंकारी मंडळाच्या 78 व्या आंतरराष्ट्रीय निरंकारी संत समागमासाठी विशेष रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा समागम दिनांक 31 ऑक्टोबर 2025 ते 4 नोव्हेंबर 2025 दरम्यान संत निरंकारी अध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा), नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने यात्रेकरूंना सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हुजूर साहिब नांदेड ते पाणिपत आणि पाणिपत ते नांदेड या दरम्यान चार विशेष रेल्वे गाडी चालविण्याचे ठरविले आहे.