छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी नायलॉन मांजाच्या अवैध विक्रीविरोधात मोठी कारवाई करत आणखी एक महत्त्वपूर्ण साठा जप्त केला आहे. ऑनलाइन विक्रीसाठी मागवण्यात आलेला मोठा नायलॉन मांजाचा साठा पोलिसांनी शहरातील एका कुरिअर ऑफिसमधून हस्तगत केला.कारवाईदरम्यान मोनो फील्ड गोल्ड नावाच्या कंपनीचे तब्बल 672 गट्टू जप्त करण्यात आले असून या मुद्देमालाची एकूण किंमत रु. 6 लाख आहे