महावितरणच्या गलथान कारभारामुळे अनेक प्रकारच्या समस्या उदभवत आहेत,कुठे शॉर्ट सर्किटमुळे तर कुठे ओव्हर लोड मुळे आगीच्या घटना घडत आहेत, उदगीर तालुक्यातील गुरधाळ येथील शेतकरी बालाजी ऊर्फ पप्पू पाटील यांच्या शेतातील उसाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना ८ डिसेंबर रोजी घडली आहे, शेतात असलेल्या विद्युत डीपीत शॉर्ट सर्किटमुळे ठिणग्या पडून शेतातील उसाला आग लागली,या घटनेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी आगीचा व्हिडीओ शोसल मीडियावर व्हायरल केला आहे