हिंगोली: शासकीय परिसरात मिरवणुका, घोषणा व सभा आयोजनास निर्बंध
हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात मिरवणुका काढणे, घोषणा तसेच सभा घेण्यास निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल गुप्ता यांनी निर्गमित केले आहेत. हे आदेश 3 डिसेंबरपर्यंत अंमलात राहणार आहेत. अशा देश सायंकाळी चार वाजता दिले आहेत.