कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर ओमी नामक एका युवकाने बलात्कार केला. त्या मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला नागपूर शहरातील मेयो रुग्णालयात नेण्यात आले जिथे ती आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. आणि गर्भातच तिच्या बाळाचा देखील मृत्यू झाला होता.या धक्कादायक घटनेच्या खुलासानंतर पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.