जालना: मी केलेल्या कामाचं फुकट श्रेय घेणार्यांचा चिल्लरपणा सहन करणार नाही : आमदार अर्जुन खोतकरांचा विरोधकांवर घणाघात
Jalna, Jalna | Oct 26, 2025 मी केलेल्या कामांचं फुकटचं श्रेय यांना घ्यायची सवय पडली आहे, अशा शब्दांत जालना मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी विरोधकांवर तीव्र निशाणा साधलाय. रविवार दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी शिवसैनिकांच्या बैठकीत हा टोला लगावला. जालन्यात माझ्या पुढाकाराने आणि प्रयत्नांमुळे अनेक विकासकामांना गती मिळाली.पण काही जणांना या कामांचं श्रेय फुकट घ्यायची सवय लागली आहे.हा चिल्लरपणा आता सहन केला जाणार नाही,असे आ.खोतकर यांनी म्हटले.