नवापूर: जय वळवी यांच्या हत्या निषेधार्थ मळवाण गावात मूक मोर्चा, कठोर कारवाईची ग्रामस्थांची मागणी
नवापूर तालुक्यातील मळवाण ग्रामपंचायत येथे जय वळवी यांच्या हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात महिला-पुरुषांसह सर्व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. शांततेत काढलेल्या या मोर्चातून हल्लेखोरांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. मोर्च्यानंतर गावकऱ्यांतर्फे दिवंगत जय वळवी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित ग्रामस्थांनी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.