राहुरी: वळण येथील हनुमान पाणी वापर संस्थेच्या चेअरमन पदी सुजाता खुळे बिनविरोध
राहुरी तालुक्यातील वळण येथील मुळा डाव्या काव्यावरील हनुमान पाणी वापर संस्थेच्या चेअरमन पदी सुजाता रमेश खुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज मंगळवारी सकाळी संस्थेच्ये सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. सभेचे कामकाज सचिव विजय शेळके यांनी पाहिले.त्यास पाटकरी सुधाकर गव्हाणे यांनी सहाय्य केले.