नगरपालिका निवडणुकीसाठी कर्तव्य बजावून घरी परतलेल्या 53 वर्षीय महिला होमगार्डचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना 3 डिसेंबर रोजी गंगाखेड येथे घडली. गंगाखेड येथील शशिकला साळवे ह्या सोनपेठ नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी तैनात होत्या. ड्युटी वरून घरी आल्या. त्यांना बुधवारी पहाटच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. त्यांना पोलीस प्रशासन व गृहरक्षक दलाच्या वतीने गोदाकाट परिसरात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करून