जालना: जिल्हाभरात नमो नेत्र संजीवनी अभियानास सुरुवात; सर्वांनी या अभियानाचा लाभ घ्यावा: डॉ. सोपान चव्हाण यांचे आवाहन
Jalna, Jalna | Sep 20, 2025 भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्याभरात नमो नेत्र संजीवनी अभियान दि 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान राबविण्यात येत आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे जालना प्रमुख डॉ. सोपान चव्हाण यांनी शनिवार दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता केलंय. हे अभियान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.