शिरपूर: शिरपूर-वरवाडे नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत निवडणूक निर्णय अधिकारी देशमुख यांनी घेतली पत्रकार परिषद
Shirpur, Dhule | Nov 7, 2025 राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर शिरपूर-वरवाडे नगरपालिकेची निवडणूक औपचारिकपणे जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे 6 वाजेच्या सुमारास नगरपालिका कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीसंबंधी सविस्तर माहिती दिली. या वेळी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत सरोदे, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, प्रशासकीय अधिकारी संजय हासवणी आदी अधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.