समुद्रपूर: वायगावची हळद सातासमुद्रापार पोहचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गिरडच्या आकाश डंभारे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव
संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेली वायगावची हळदीने आता सातासमुद्रापार भरारी घेण्यास सुरुवात झाली आहे.नुकतीच वर्धा येथून पालकमंत्री पंकज भोयर जिल्हाधिकारी वान्मशी सी यांनी हिरवी झेंडी दाखवून १ कंटेनर हळद दुबई येथे रवाना केले.यात वायगावाच्या हळदिला दुबई,सह जर्मनी, डेन्मार्क, नेदरलॅंड, तसेच युरोपियन जागतिक बाजारपेठेत पाठविण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे गिरड येथिल अगदी गरीब कुटुंबातील ईफिक्कीचे सदस्य आकाश डंभारे यांचा व त्यांच्या आई-वडिलांचा पालकमंत्री पंकज भोयर यांनी गौरव केला.