20 डिसेंबरला नगरपरिषद नरखेड आणि कोंढाळी येथे सार्वत्रिक निवडणूक असून त्या अनुषंगाने आज पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी तेथील मतदान केंद्रांना भेट दिली. पोलीस अधीक्षकांनी स्वतः मतदान केंद्राची पाहणी करून मतदान केंद्रावर सुरक्षेच्या उपायोजना तपासून घेतल्या. व संबंधितांना महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या