तळोदा: आदिवासी युवक जयेश वळवी हत्येचा निषेधार्थ तळोदा शहर आज कडकडीत बंद
आदिवासी युवक जयेश वळवी यांच्या हत्येच्या निषेधार्थ व मृतकाला न्याय मिळावा, या मागणीसाठी जय आदिवासी युवाशक्ती (JAYS), जय आदिवासी ब्रिगेड, जय आदिवासी एकलव्य ब्रिगेड तसेच विविध सामाजिक व आदिवासी संघटनांनी दिलेल्या शहर बंदच्या हाकेला आज शनिवार, २० सप्टेंबर रोजी तळोदा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सकाळपासूनच शहरातील बहुतांश दुकाने, बाजारपेठा, व्यापारी प्रतिष्ठाने वगळता अत्यावश्यक सेवा दवाखाने व मेडिकल सुरू ठेवण्यात आले. यामुळे अन्यत्र सर्वत्र शुकशुकाट पसरला होता.