आर्वी: गुराढोरामुळे अपघातात झाली वाढ.. आणि नगरपालिकेला आली जाग.. मोकाट जनावरे दिसल्यास होणार कार्यवाही...
Arvi, Wardha | Oct 2, 2025 आर्वी शहरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर तसेच इतरही ठिकाणी मोकाट गुराढोरामुळेअपघातात सातत्याने वाढ झाली आहे अनेकदा वर्तमानपत्रात बातम्या येऊनही नगरपालिकेचे सातत्याने दुर्लक्ष असल्याची ओरड नागरिकांची होती त्यामुळे आता नगरपालिकेला जाग आली आहे , एक तारखेला जा. क्र 14 91 /2025 नुसार नगरपालिकेने मोकाट जनावरे फिरताना आढळल्यास त्यांना पकडून कोंडवाड्यात कोंडण्यात येईल आणि मालका विरुद्ध महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम नुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचे आज सांगितले