शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळी पूर्वीच द्या 4 ऑक्टोबर रोजी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात पैठण येथे मोर्चा
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 1, 2025
आज दिनांक 1 ऑक्टोबर सकाळी 11:30 वाजता पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने दिवाळीपूर्व मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शेतकरी नेते व खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली ४ ऑक्टोबर रोजी पैठण येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे माऊली मुळे यांनी दिली.