दर्यापूर: काठीपुरा येथे अठरा वर्षी तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या;शवविच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात
दर्यापूर मार्गावरील काठीपुरा भागातल्या राहणाऱ्या कुमारी श्वेता नरेंद्र चांदुरकर वय १८ वर्षे या तरुणीने स्वतःच्या राहत्या घरात काल सायं ६ वाजताच्या सुमारास गळफास आत्महत्या केली.मृत तरुणीला दोन बहिणी असून आई वडील मजुरी काम करतात.आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.घटनेची माहिती परिसरात होताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी श्वेताचा मृतदेह अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय येथे पोस्टमार्टम करीता नेण्यात आले.