परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या थंडीमुळे, शेतकऱ्यांच्या पशुधनावर विपरीत परिणाम दिसायला लागले असून, आज दिनांक १३ डिसेंबरला सकाळी सात वाजता वरला येथील एका शेतकऱ्यांच्या गोठ्यातील थंडीमुळे बैलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अंदाजे 25 ते 30 हजार रुपये किमतीचा असलेला बैल, थंडीच्या कडाक्याने मृत्युमुखी पडला असून, वाढत्या थंडीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील तुरीच्या पिकावर देखील अज्ञात रोगाचे आक्रमण दिसायला सुरुवात झाली आहे