जालना महानगरपालिका निवडणुकीआधी महायुतीत फूट.. आज दिनांक 30 मंगळवार रोजी संध्याकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुका १५ जानेवारी रोजी होणार असून, जागावाटपावरून सुरू असलेल्या दीर्घकालीन चर्चांनंतर आणि अंतर्गत मतभेदांमुळे महायुतीत अखेर फूट पडली आहे. मंगळवारी, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी, महायुतीतील पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने ही फूट स्पष्ट झाली. महायुतीतील प्रमुख घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट)