बुलढाणा: शहरातील राम नगर येथे अनिकेत पवार यांची लष्करात लेफ्टनंट व सहाय्यक कमांडर पदी निवड झाल्याबद्दल सत्कार
बुलढाणा शहरातील राम नगर येथे रंगनाथ पवार यांचा मुलगा चि.अनिकेत रंगनाथ पवार याने देशात नावलौकिक कमावत एकाचवेळी भारतीय लष्करातील लेफ्टनंट व तटरक्षक दलातील सहाय्यक कमांडंट या दोन उच्च पदावर निवड झाल्याबद्दल 23 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बरदे आदी उपस्थित होते.