मुर्तीजापूर: संत ज्ञानेश्वर नगरीतील संत गजानन महाराज मंदिरालगत निघालेल्या विषारी सापाला सर्पमित्र मुन्ना श्रीवासने दिले जीवनदान
तालुक्यात कुठेही साप आढळला तर त्या भागातील लोकांच्या हाकेला साद देऊन तत्परतेने सापाला जीवनदान देणारे सर्पमित्र मुन्ना श्रीवास यांना श्री गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणात साप असल्याचे राजू ठाकरे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सर्व मित्र मुन्ना श्रीवास यांना शुक्रवार ३ ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या दरम्यान सांगितले असता सर्पमित्र यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अत्यंत विषारी जातीच्या कोब्रा नागाला जीवनदान दिले त्यांच्या या कार्याचा परिसरातील रहिवाशांनी कौतुक केले.