वर्धा: शहिदी समागम कार्यक्रमास जिल्ह्यातून हजारो भाविक जाणार:जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पुर्वतयारी व नियोजनाचा आढावा
Wardha, Wardha | Dec 1, 2025 हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी शताब्दी समागम वर्षानिमित्त नागपूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल व सिंधी समाजबांधव मोठ्या संख्येने जाणार आहे. त्याअनुषंगाने पुर्वतयारी व नियोजनाचा जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी आढावा घेतला.