सावंतवाडी: पंतप्रधानांच्या मातेबद्दल काँग्रेसने अपशब्द वापरून समस्त मातृशक्तीचाकेला अपमान: सावंतवाडीत भाजप महिला मोर्चातर्फे निषेध
पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असले तरी, ते संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या मातेबद्दल अपशब्द वापरणे, किंवा त्यांच्याबद्दल चुकीची चित्रे रेखाटणे, हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर, देशातील समस्त मातृशक्तीचा अपमान आहे. असे सांगत भाजप महिला मोर्चा तर्फे काँग्रेसने बिहार निवडणुकीच्या निमित्ताने द्वेष पसरवून मातृशक्तीचा अपमान केला, याचा जाहीर निषेध आज रविवार १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता सावंतवाडी येथे केला.