जावळी: मेढा पोलीस ठाण्यातच दिव्यांग बांधवांचा निषेध, नोटीस बजावणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी
Jaoli, Satara | Jun 18, 2025 दोन दिवसांपूर्वी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावी शिवसागर जलाशयात दिव्यांग बांधवांना महिन्याला सहा हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, लतिका जगताप हिचे घर बांधुन द्यावे, २०० स्केअर मीटर व्यावसायाला जागा द्यावी आदी मागण्यासाठी जलसमाधी आंदोलन केले होते. त्यावरुन मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मेढा पोलिसांनी अजय पवार, नामदेव इंगळे यांना नोटीस बजावली होती. त्या प्रकरणी दिव्यांग बांधव मेढा पोलीस ठाण्यात बुधवारी सकाळी १० वाजता पोहचले असता तपासी अधिकारी नव्हते.