गोंदिया: नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे
महाराष्ट्राच्या चार नोव्हेंबर रोजी नगरपरिषद व नगरपंचायती करिता सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून सर्व संबंधित यंत्रणांनी निवडणुकीच्या जाहीर झालेल्या कालावधी दरम्यान आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून निवडणूक सुलभरित्या पार पाडावी असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी आज पाच नोव्हेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत केले यावेळी जिल्हाधिकारी मानसी पाटील व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर उपस्थित होते