ग्राहकांच्या हक्कांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने तहसील कार्यालय, सेलू येथे राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात व थाटात साजरा करण्यात आला. पुरवठा विभागाच्या पुढाकाराने तसेच शासन व ग्राहक चळवळीतील संघटनांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम दि. २४ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, वर्धाच्या अध्यक्षा श्रीमती वैशाली गजभिये होत्या.