महाबळेश्वर: राज्यपालांच्या महाबळेश्वर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग; थेट सुरू केले डांबरीकरणाचे काम
दिवाळी सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रासह पर राज्यातील पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल होत असतानाच राज्यपाल आचार्य देवव्रत हे शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी महाबळेश्वरच्या दोन दिवशीय दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला अचानक जाग आली असून त्यांनी शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वरमध्ये मुख्य रस्त्यांवर डांबरीकरणाचे काम सुरू केले. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला.