विक्रमगड: वसई तहसील कार्यालय येथे आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवड्याचा शुभ
वसई तहसील कार्यालय येथे वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवडा उपक्रम कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध योजना सेवा यांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी आमदारांच्या हस्ते नागरिकांना विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रांत अधिकारी शेखर घाडगे, तहसीलदार डॉ. अविनाश कोष्टी, नायब तहसीलदार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी नागरिक उपस्थित होते.