मुकुंदनगर देगलूर तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथे आरोपीचे घरासमोर दि 1 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 14:50 चे सुमारास यातील आरोपी रामचंद्र दहीकांबळे हा विनापरवाना बेकायदेशीरित्या विदेशी दारू किमती 8 हजार 400 चा मुद्देमाल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगलेला पोलिसांना मिळून आला. याप्रकरणी फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल बुंगई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी देगलूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सगरोळीकर हे आज करीत आहेत.