विक्रमगड: सांसद खेल महोत्सवाचे २ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान पालघर येथे आयोजन - खासदार डॉ हेमंत सवरा
सांसद खेल महोत्सवाचे पालघर येथे २ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा विश्वात भारत महासत्ता बनावा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्याच्या अनुषंगाने या खेल महोत्सवाचे आयोजन करण्यात आहे. विविध प्रकारच्या दहा खेळांचा या महोत्सवात समावेश असून क्रीडा क्षेत्रातील नामवंत खेळाडू देखील महोत्सवात उपस्थिती दर्शवणार असल्याची माहिती खासदार डॉ.हेमंत सवरा यांनी पालघर येथे पत्रकार परिषदेत दिली.