नागपूर ग्रामीण: बुटीबोरी येथून बेपत्ता झालेली मुलगी आढळली बोथली येथे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कार्यवाही
पोलीस ठाणे बुटीबोरी हद्दीत राहणारी अल्पवयीन मुलगी ही दिनांक 30 जानेवारीला घरून निघून गेली होती याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने तांत्रिक माध्यमाच्या सहाय्याने तपास करून या मुलीला उमरेड तालुक्यातील बोथली येथून ताब्यात घेतले. व बुटीबोरी पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे