धारणी: कमरेला व शातीला दगड बांधून विहिरीत टाकून इसमाचा खून,धारणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
धारणी येथे मोहम्मद जुबेर उर्फ चिंटू मोहम्मद जहूर व 39 वर्ष नावाच्या इसमाला कमरेला व छातीला जात्याचे दगड बांधून विहिरीत टाकून खून केल्याची घटना २४ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजताची दरम्यान उघडकीस आली आहे. याबाबतीत मोहम्मद रमीज मोहम्मद जहूर यांनी 25 डिसेंबरला सायंकाळी सहा वाजून 28 मिनिटांनी अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यातील मृतक मोहम्मद जुबेर उर्फ चिंटू मोहम्मद जहूर वय 39 वर्ष याचे कमरेला व छातीला जात्याचे दगड निळ्या दुरीच्या साह्याने बांधून त्याला विहिरीमध्ये टाकण्यात आले.