पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीतील संत सावता शाळेजवळ राहणाऱ्या गीता कुंभारे या आपल्या घराला कुलूप लावून परिवारासह दुबे नगर येथे वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले असता अज्ञात आरोपीने त्यांच्याकडे प्रवेश करून रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने तसेच जुने दोन मोबाईल असा एकूण १,९६,३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकारे प्राप्त तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.