बुलढाणा: मोताळ्याचे लाचखोर तहसीलदाराला 2 दिवसांची पोलीस कोठडी
मोताळा तालुक्यातील थड येथील एका शेतकऱ्याची शेत जमीनीचा भोगवटदार वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये करण्यासाठी आणि सदर जमीन विक्री करण्याची परवानगी देण्यासाठी शेतकऱ्या कडून 2 लाखाची लाच स्वीकारताना मोताळा तहसीलदार हेमंत पाटील यांना त्यांच्या बुलढाणा येथून एसीबीने काल अटक केली होती.आरोपी हेमंत पाटील यांना आज बुलढाणा कोर्टात हजर केले असता त्यांना 17 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.