समुद्रपूर: १० वि च्या परीक्षेत तालुक्यातील समिक्षा भोयर प्रथम,रीया बहादुरे,तर जानवी बोचर :तालुक्याचा निकाल ९०.०९ टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत संस्कार ज्ञानपीठची समिक्षा गोविंदा भोयर ९५.६० टक्के गुण घेत तालुक्यात प्रथम आली तर रिया बहादुरे ९५.२० टक्के घेत द्वितीय तर जानवी पंकज बोचर ९४.८० टक्के गुण घेत तृतीयस्थानी राहिली आहे. तालुक्याचा निकाल ९०.०१ टक्के लागला असून नऊ शाळांचा शतप्रतिशत निकाल लागला आहे.दहावीच्या परिक्षेत १०२१ विद्यार्थ्यानी आवेदन पत्र भरली होती.१०१२ विद्यार्थी परिक्षेत प्रविष्ट झाले यापैकी ९११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.