समुद्रपूर: गिरड येथील बौद्ध विहारात बौद्ध पोर्णिमा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन:भगवान गौतम बुद्ध यांचा सर्वत्र जयघोष
विश्वावाला अहिंसा व शांतीचा संदेश देणारे भगवा गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या उप लक्षात गिरड येथील बौद्ध विहारात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बौद्ध विहार कमिटीच्या वतीने भगवा गौतम बुद्ध यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्यात आला यावेळी गिरडचे सरपंच राजु नौकरकर माजी पंचायत समिती सदस्य शेख इस्राईल आदिसह गावातील गणमान्य व्यक्त उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गिरड येथील बौद्ध विहार कमिटीच्या सदस्यांनी सहकार्य केले.