गोंदिया: संविधान चौक येथे महसूल सेवकांचे धरणे आंदोलन, गोंदिया जिल्ह्यातील महसूल सेवकांचा सहभाग
Gondiya, Gondia | Sep 14, 2025 महसूल सेवक कोतवाल पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याच्या मागणीसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी संविधान चौक येथे धरणे आंदोलन केले. महसूल सेवक कोतवाल पदास शासनाच्या वर्गीकृत कर्मचाऱ्याप्रमाणे सेवा सुविधा लागू केलेल्या नाहीत. त्यामुळे शासकीय सेवा करीत असताना महसूल सेवक यांना खूप अन्याय सहन करावा लागत आहे. महसूल सेवक कोतवाल पदाची महसूल यंत्रणेतील स्थान आणि कार्य लक्षात घेता महसूल सेवा कोतवाल यांना इतर महसूल कर्मचाऱ्याप्रमाणे शासकीय सुविधा देण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली आहे.