कन्नड: ७१ वर्षांचा हैदराबाद कुळवाद अखेर संपला; तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या मध्यस्थीने समझोता
प्रलंबित असलेले औराळा येथील तब्बल ७१ वर्षांपासून प्रलंबित असलेले हैदराबाद कुळसंबंधी जमिनीचे दोन वाद अखेर तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या मध्यस्थीने मिटविण्यात आले.या उल्लेखनीय तडजोडीबद्दल तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी संबंधित धन्नुलाल भारतीया, प्रकाश निकम, शिवाजी निकम, दादासाहेब इंगळे यांना स्वतःच्या दालनात पेढे भरवून सत्कार केला.औराळा येथील सर्वे नं. ६७/१ आणि ६८/१, तसेच गट क्रमांक १४७, एकूण ७ एकर १७ गुंठे क्षेत्रफळाच्या जमिनीवर कलम ३८ (ई) नुसार प्रलंबित होता