गोंदिया: मरारटोली बस स्थानकावर वाहतूकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ऑटो चालकावर रामनगर पोलिसात गुन्हा दाखल
दिनांक 4 नोव्हेंबर च्या सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास रामनगर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या मरारटोली बस स्थानकावर ऑटो क्रमांक एमएच 35 ए एच 1734 हा ऑटो सार्वजनिक रस्त्यावर उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपी सत्यम कारोसिया वय 28 वर्ष राहणार सिव्हील लाईन रेल्वे कॉटर गोंदिया याच्यावर पोलीस हवालदार सुमेद चंद्रिकापूरे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी भारतीय कलम 285 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे.