आज सार्वजनिक हनुमान मंदिर, पिपळा (डा. बं.), ता. सावनेर येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा पुराण ज्ञानयज्ञ व अखंड हरीनाम सप्ताह निमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमास राज्याचे माजी मंत्री मा. सुनील बाबूजी केदार साहेब यांच्यासह उपस्थित राहण्याचा पावन योग लाभला. अशा धार्मिक, सांस्कृतिक व समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून समाजात एकात्मता, सद्भावना व आध्यात्मिक चेतना निर्माण करणाऱ्या सर्व आयोजकांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन व्यक्त केले.