जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने केलेल्या कारवाईत बेकायदेशीर अग्नीशस्त्र विक्रीप्रकरणी दोन आरोपींना अटक करून सुमारे 2 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मंगळवार दि. 16 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत दोन गावठी कट्टे, तीन जिवंत काडतूस, एक मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.जालना डी.बी. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के व त्यांचा स्टाफ सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली.