रेणापूर: जिल्हा बँकांच्या भरतीमध्ये भूमिपुत्रांसाठी ७० टक्के जागा माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश
Renapur, Latur | Nov 2, 2025 जिल्हा बँकांच्या भरतीमध्ये भूमिपुत्रांसाठी ७० टक्के जागा -------- माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश; यापू्र्वीच्या भरतीतही जागा राखीव राहणार - लातूर/प्रतिनिधी-राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या भरती प्रक्रियेत स्थानिक जिल्ह्याचे रहिवाशी असलेल्या भूमिपूत्रांना संधी मिळणार आहे. या भरती प्रक्रियेत जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांसाठी ७० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. तसा निर्णय शासनाच्या सहकार विभागाने शुक्रवारी (दि. ३१) घेतला आहे.