पाथर्डी बस स्थानकावर झालेल्या चोरीच्या संशयावरून 'रिल स्टार' कोमल काळे हिला जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले होते. तिला सोमवारी जामीन झाला होता. आज परत शेवगाव स्थानिक पोलिसांनी नगर ते शेवगाव दरम्यान एसटी बसमध्ये प्रवास करीत असताना एका प्रवाशाच्या पत्नीच्या पर्समधून सोन्या-चांदीचे दागिने चोरीस जाण्याच्या प्रकरणात कोमल काळे हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले व आज शेवगाव न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.