बांगलादेशात हिंदू समाजावर सुरू असलेले अत्याचार आणि तरुण दिपू चंद्र दास याची जमावाकडून झालेली निर्घृण हत्या,याच्या निषेधार्थ आज सकाळी ११:३० वाजता अंजनगाव सुर्जीत संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला.विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने अंजनगाव सुर्जी येथील नवीन बस स्थानक चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.आणि बांगलादेशातील मोहम्मद युनुस सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत बांगलादेश सरकारचा निषेध व्यक्त केला.