तुळजापूर: पर्यायी व्यवस्था होईपर्यंत एकही घर हलविणार नाही
तडवळा येथील रेल्वे प्रकल्प बाधित कुटुंबियांना आमदार पाटील यांचा दिलासा
जोपर्यंत तडवळा गावातील नागरिकांच्या घरांची पर्यायी व्यवस्था होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला राहत्या घरातून कोणीही हलवणार नाही, काळजी करू नका. पर्यायी घरांसाठी जिल्हा प्रशासन योग्य जागा शोधून देईल, तोपर्यंत तुम्हाला अडचणीत टाकून कुठलेही काम पुढे जाणार नाही अशा शब्दात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर तालुक्यातील तडवळा येथील ग्रामस्थांना आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता दिलासा दिला.