अमळनेर: २७ कुख्यात गुन्हेगारांना जळगाव शहरातून हद्दपार; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांचा 'सर्जिकल स्ट्राईक
महानगरपालिका निवडणुकीच्या काळात शहरात दहशत निर्माण होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जळगाव पोलीस दल आणि जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शहरातील २७ सराईत गुन्हेगारांना ९ दिवसांसाठी शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी गुरुवारी ८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता यासंदर्भातील कठोर आदेश निर्गमित केले.