साकोली: उपविभागीय पोलीस अधिकारींची शिरेगाव जंगल शिवारात रेती चोरी करणाऱ्या ट्रकवर कारवाई,22लाख11हजार रुपयाचा माल जप्त
साकोलीतील उपविभागीय पोलीस अधिकारी कर्यालयात नुकतेच नियुक्त झालेले नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिवम इसापुरे यांच्या मार्गदर्शनात आणि उपस्थितीत शिरेगाव जंगलशिवार ते नवेगाव जाणारा रोड यादरम्यान रेती चोरी करताना आढळलेल्या ट्रकवर शनिवार दि18आँक्टोबरला सकाळी10वाजता कारवाई करून अशोक लेलँड कंपनीचा ट्रक व दोन ब्रास रेती असा एकूण 22लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रॅक मालक दीपक चांदेवार व ट्रॅक चालक जीवन चाचेरे या दोघांवर साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे