कन्नड: “खड्ड्यात दिवा लावत दिला इशारा!” चिंचोली लिंबाजीतील सामाजिक कार्यकर्ते भुजंग यांचा दिवाळीतील अनोखा संदेश व्हायरल
कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे दिवाळी सणानिमित्त एक अनोखी सामाजिक जाणीव दिसून आली.येथील मुस्लिम बांधवांच्या ईदगाहजवळ रस्त्यावर मोठा खड्डा पडलेला होता.या खड्यातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता.त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग यांनी पुढाकार घेत आज दि २१ ऑक्टोबर रोजी सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास या खड्यात दिवाळीचा दिवा लावला.यामागचा उद्देश म्हणजे लोकांचे लक्ष त्या धोकादायक खड्याकडे वेधणे हा होता.