गडहिंग्लज: गडहिंग्लजमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात रास्ता रोको; राजू शेट्टी व माजी आमदार राजेश पाटील अटकेत
गडहिंग्लजमध्ये नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज गुरुवारी १० जुलैला रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी आमदार राजेश पाटील यांना दुपारी एक वाजता पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.