चामोर्शी: रेपनपल्लीच्या ताटीगुडम येथे अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण
अहेरी: अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली ग्रामपंचायतीच्या ताटीगुडम गावात नवीन अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण नुकतेच पार पडले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.ताटीगुडम गावातील नागरिकांनी गावामध्ये अंगणवाडीची आवश्यकता असल्याचे अजय कंकडालवार यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर, कंकडालवार यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून या बांधकामासाठी निधी मंजूर करून घेत